आता चोरट्यानी आपला मोर्चा कांदा चाळीकडे वळविला असून शेतातील चाळीत ठेवलेल्या चक्क 25 क्विंटल कांदा चोरट्यानी लंपास केल्याची घटना माळीवाडा शिवारात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश लक्ष्मण गाजरे वय-41(रा.सावता मंदिर जवळ,माळीवाडा) यांची गावातील गट क्रमांक 92 मध्ये शेती आहे. शेतातील चाळीमध्ये सुमारे 20 ते 25 क्विंटल कांदा त्यांनी ठेवला होता. तो कांदा ते येत्या काळात विकणार होते. तत्पूर्वी बुधवारी रात्री 12 ते पहाटे 6 च्या दरम्यान चोरट्यानी तो कांदा लंपास केला. ही बाब सकाळी समोर आल्यावर गाजरे यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय शिंदे करीत आहेत.